-तुषार सणस
सारोळा : भोलावडे (ता. भोर) येथील शाळेत दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात भाजपचे किरण दगडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गायकवाड यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज थोपटे यांच्यावर टीका केली. या घटनेचा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करून कापूरव्होळ येथे सोमवारी (ता. 7) पुणे- सातारा महामार्गावर काही काळ रोखला होता. व टीका करणाऱ्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर जोडो मारो आंदोलन करुन त्याचे दहन केले होते.
दरम्यान, आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी, भाषणे करून प्रतिकात्मक स्वरूपात निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाचे शेवटी अचानक प्रतिकात्मक चित्रे आणून ते डिझेल टाकून पेटवून देवून दहन केले. कॉंग्रेसच्या आंदोलकांनी आंदोलन करताना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 170 कार्यकर्त्यांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार मयुर महादेव निंबाळकर यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लहूनाना शेलार (पूर्ण नाव माहित नाही रा.हातवे ता. भोर जि.पुणे), महेश धाडवे (रा. सारोळा ता.भोर जि.पुणे), चंद्रकांत मळेकर ( रा.भोर ता. भोर जि.पुणे), रोहन बाठे ( रा. कापूरहोळ ता. भोर जि.पुणे), अॅड. यशवंत शिंदे (रा. शिंदेवाडी ता.भोर जि.पुणे), विठ्ठल आवाळे (रा. भोलावडे ता.भोर जि.पुणे), मदन खुटवड ( रा. हातवे ता. भोर जि.पुणे), धनंजय वाडकर ( रा. ससेवाडी ता. भोर जि.पुणे), गणेश पवार (रा.भोर ता. भोर जि.पुणे), सुमंत शेटे (रा.भोर जि.पुणे), समीर सागळे (रा.भोर ता.भोर जि.पुणे), अमित सागळे (रा.भोर ता.भोर जि.पुणे), सचिन हर्णसकर ( रा.भोर ता. भोर जि. पुणे), महेश टापरे ( रा. टापरेवाडी ता. भोर जि.पुणे), चेतन कोंढाळकर ( रा. किकवी ता.भोर जि.पुणे), शैलेशदादा सोनवणे, पोपट सुके ( रा. निगडे ता भोर जि पुणे), के. डी. सोनवणे (रा. नाव्ही ता. भोर जि. पुणे), उत्तम थोपटे (वरील सर्व आरोपींचे वय पुर्ण नाव माहित नाही) व इतर अनोळखी 130 ते 150 जणांवर भारतीय न्याय संहिता अधि. 2023 (बी.एन.एस.) चे कलम 189 (2), 190, 188 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कोल्हे करीत आहेत.