लोणी काळभोर : तू शाळेत का गेला नाही? असे आईवडील ओरडल्याने नववीतील मुलगा थेट घरातून पळून गेला आहे. ही घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) परिसरात 27 सप्टेंबर ला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
समाधान विजयकुमार चव्हाण (वय-14 वर्ष, 10 महिने) असे रागाने पळून गेलेल्या मुलाचे नाव आहे. त्याप्रकरणी समाधानचे वडील विजयकुमार लक्षण चव्हाण (वय-38, रा. तरडे, ता. हवेली) यांनी मुलगा पळून गेल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
समाधान चव्हाण हे एक पुण्यातील एका शाळेत बसचालक म्हणून काम करतात. तर ते कुटुंबासोबत तरडे येथे राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. समाधान हा आळंदी म्हातोबाची येथील म्हातोबा विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर मुलगीही त्याच शाळेत शिकत आहे. दोघेही शाळेत जाताना व येताना एकत्र येत असे.
दरम्यान, 26 सप्टेंबरला समाधानने शाळेला दांडी मारली होती. त्यामुळे समाधानाचे वडील त्याला रागावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला फिर्यादी हे नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समाधान व त्याची बहिण शाळेत चालली होती. तेव्हा समाधान हा मित्राला भेटून येतो. असे म्हणून गेला तो परत घरी आलाच नाही. त्यानंतर विजयकुमार चव्हाण यांनी मुलगा समाधानचा सर्वत्र शोध घेतला. मात्र समाधान मिळून आला नाही.