Political News : सासवड, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे मंगळवारी (ता. १६) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असून या वृत्ताला टेकवडे यांनी दुजोरा दिला आहे. (Political News)
अजिंक्य टेकवडेसह कार्यकर्त्यांचाहि पक्षप्रवेश..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुरंदरमधील भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात मी व माझा मुलगा बारामती लोकसभा मतदार संघाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे व काही कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष प्रवेश करीत आहोत, असे टेकवडे यांनी सांगितले.
अशोक टेकवडे हे युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते निकटवर्ती समजले जात. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी विजय कोलते यांनी प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचा राजीनामा दिल्यावर अजित पवार यांनी निवड मंडळावर 1993 मध्ये अशोक टेकवडे यांना हे पद दिले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून अजित पवार यांनी त्यांना संधी दिली. त्यातून पुढे जिल्हा बँकेचे काही काळासाठी टेकवडे अध्यक्षही झाले.अजित पवार यांनी टेकवडे यांचे नेतृत्व नवा चेहरा म्हणून आणखी पुढे आणले. सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर -हवेली मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी टेकवडे यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मिळवून देण्यात अजित पवार यशस्वी झाले. माजी आमदार, काँग्रेस नेते कै. चंदुकाका जगताप यांनी आघाडी धर्म पाळत साथ दिल्याने सुमारे १४ हजारांच्या मताधिक्याने अशोक टेकवडे धर्मनिरपेक्ष जनतादल नेते तथा माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांचा पराभव करीत निवडून आले. त्यातून पुरंदरमध्ये राजकीय भाकरी फिरविली गेली.
दरम्यान याबाबत बोलताना अशोक टेकवडे म्हणाले,
“मी पुरंदर-हवेलीचा आमदार होतो. तेव्हापासून लोक त्यांची कामे घेऊन माझ्याकडे येतात. काहींची गावची विकास कामे असतात. काही व्यक्तीगत कामे घेऊन येतात. शेतकऱ्यांची विविध प्रश्न आहेत. ही कामे मार्गी लागली नाही, तर लोकांना काय उत्तर द्यायचे. त्यात मी मांडलेल्या काही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दखल घेतली नाही. माझ्याकडे लक्ष न देण्याचा तो पक्षाचा निर्णय असेल. त्यामुळे मी जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा सोहळा रंगणार
Loni Kalbhor : लोणी स्टेशन चौकात श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत