सायबर गुन्हेगारी घटनेत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवून कमी पैशात जास्त नफ्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक केली जाते, दरम्यान, अनेक नागरिक बळी पडतात आणि आयुष्य भाराची कमाई गमावून बसतात. ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, वाघोली परिसरातील अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. एका रहिवाशाने शेअर बाजार गुंतवणूक योजनेला बळी पडून त्याचे 39.85 लाख रुपये गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सायबर फसवणुकीच्या या वाढत्या घटना सायबर गुन्हेगारांकडून निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांची आठवण करून देतात. दरम्यान, नागरिकांनी अशा फसव्या योजनांना बळी बदू नये म्हणून सरकार वेळोवेळी अनेक जनजागृती मोहीम राबवत असतात. या प्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, घोली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध दोन गुन्हा दाखल केले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.