उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथून कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली 22 वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (ता. 15) सकाळी साडेसात ते सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दिव्या दिलीप तसेवाल (वय – 22), गडकरी वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वडील दिलीप कचरूसिंग तसेवाल (वय – 49, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप तसेवाल हे कुटुंबीयांसोबत उरुळी कांचन परिसरात राहतात. त्यांची मुलगी दिव्या हि पुण्यात कॉलेजला आहे. व ती रोज रेल्वेने ये-जा करते. रोजच्याप्रमाणे शनिवारी घरातून सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरातून कॉलेजला जाते सांगून बाहेर गेली. सायंकाळचे सात वाजले तरी घरी आली नाही.
ती वापरत असलेल्या मोबाईल फोनवर वारंवार फोन केला मात्र फोन लागला नाही. यावेळी उरुळी कांचन येथे येणाऱ्या रेल्वेची वाट पाहिली मात्र ती आली नाही. याप्रकरणी तसेवाल यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली.
दिव्याची उंची हि 5 फुट 6 इंच, रंग – गोरा, बांधा – सडपातळ, केस – काळे, नाक – सरळ, डोळयाला चश्मा, डाव्या डोळयाच्या भुवईजवळ व डाव्या बाजुला ओठाजवळ काळे तीळ आहे. तिने निळे रंगाची जिन्स फुलपॅन्ट, फुल बाहयाचा पिंक -क्रिम रंगाचा टॉप व पायात ग्रे – पिंक रंगाचा बूट घातलेला आहे. तिला मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषा बोलयला येतात.
दरम्यान, या मुलीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास उरुळी कांचन पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.