उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल, एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये रविवारी (ता. १०) सकाळी इंडिया बार ऑफ कौन्सिलची मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ९८४ परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ९५९ जणांनी परीक्षा दिली, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन यांनी दिली.
अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित महादेव कांचन कॉलेज ऑफ फॉर्मास्युटिकल, एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये प्रामुख्याने पोलीस भरती, नीट, जेईई, इंडिया बार ऑफ कौन्सिलच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा सुरू होण्यापूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी परीक्षार्थींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच या परीक्षेसाठी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार काळे यांनी परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून काम पहिले. त्याचबरोबर प्राध्यापक कुणाल हाके, प्राचार्या योगिनी धारवाडकर, उपप्राचार्या कांचन चव्हाण तसेच शिक्षक, सेवकवर्ग, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.