लोणी काळभोर (पुणे)-आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत सर्व भारतीयांना तिरंगा फडकविण्याचे अवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पूर्व हवेलीतील नागरिकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला आहे.
स्वातंत्र्यदिना निमित्त लोणी काळभोर पोलिसांकडून आज सोमवारी (ता.१५) बाईक रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांचे ५० हून अधिक पोलीस सहकारी सहभागी झाले होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ध्वजारोहण पोलीस निरीक्षक मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आला.
लोणी काळभोर येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच माधुरी काळभोर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना माधुरी काळभोर म्हणाल्या कि, आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. हा दिवस अभिमानाचा आहे, आकाशातील उंचीला स्पर्श करुन फडकणारा तिरंगा कोणत्याही भारतीयांच्या मनाला स्फूर्ती आणि अभिमान देण्यासाठी पुरेसा आहे. असे मत काळभोर यांनी मांडले.
यावेळी उपसरपंच भारती काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, सदस्य योगेश काळभोर, ज्योती काळभोर, संगीता काळभोर, नागेश काळभोर, गणेश कांबळे, राहुल काळभोर, सविता लांडगे, प्रियंका काळभोर, ललिताताई काळभोर, सविताताई जगताप, राजेंद्र काळभोर, अमित काळभोर, सचिन काळभोर, नितीन जगताप, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, आसी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व परिसरातील गावांमधील शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी तेथील प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.