पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील घोटावडे गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत परराज्यातील दारू ०४ वाहनासह ४० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आंबटवेट रोडवर सापळा रचून केली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. किरण ज्ञानोबा साळुंके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील घोटावडे गावच्या हद्दीत आंबटवेट रोडवर सापळा लावला असता चारचाकी वाहनामधून दारू एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्यात येत होती. यामध्ये विदेशी दारूचे एकूण १८ बॉक्स तसेच महाराष्ट्र राज्याचे बनावट लेबल लावले होते.