योगेश मारणे
न्हावरे: न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (दि.२०) दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सन २०२३-२०२४ चा गळीत हंगाम बंद होता. तसेच कारखान्याच्या कामगारांचे अनेक महिन्यांपासून पगारही रखडलेले आहेत. त्यामुळे घोडगंगाची उद्या होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार असून, सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारखाना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, विरोधकांकडूनही कारखान्याच्या सर्वसाधारण सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.