पुणे : राज्यात अंगणवाड्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातली शिक्षणात मोठे बदल दिसून येत आहेत. त्यामुळे आता अंगणवाडीत सेविकांची भरती सुरू करण्यात आली आहे. यात हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. ३१ मे २०२३ पूर्वी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अंगणवाड्यांमध्ये २०१७ पासून पदे रिक्त आहेत. तेव्हा पासून राहिलेले एकूण २० हजार पदे आता भरली जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे. अंगणवाडी सेविकांचीही पदभरती यानिमित्ताने केली जाणार आहे. ३१ मे २०२३ पुर्वी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंगणावाडी सेविकांसाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही पदवी, पद्यूत्तर पदवी, उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल. त्याप्रमाणे किमान वयोमर्यादा ही ३५ वर्षे असणे अनिवार्य आहे.
या पदांसाठी होणार भरती…
मिनी अंगणवाडी सेविका – ११
अंगणवाडी मदतनीस – ७०००
अंगणवाडी सेविका – ४७५
रिक्त पदे – २० हजार ६०१