पुणे : पुणे जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींचे आज रविवार (ता.१८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी ५१९ तर सदस्यपदासाठी ३०१३ उमेदवार रिंगणात उतरले आहे.
यांमधील ४५ ग्रामपंचायतीचे सरपंच व २७ ग्रामपंचायतींमधील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता सरपंचपदाच्या १६७ जागांसाठी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात नव्याने स्थापित आणि मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी १६७ जागांवर ५१९ उमेदवार, तर १०६२ सदस्यपदांसाठी ३०१३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य पदांच्या १०६२ जागांसाठी मतदान होत असून त्यासाठी ३०१३ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान करण्याची वेळ ही आज सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे.
मतमोजणी ही मंगळवारी (ता.२० डिसेंबर) तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे तर निकालाची अधिसूचना शुक्रवारी (ता.२३ डिसेंबर) तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत.