शिक्रापूर : उलट्या झाल्याने एका १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. साईशा सचिन शिंदे (वय १४ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत नारायण जयवंत चव्हाण (वय ५० रा. नवयुग नगर सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ही घटना सणसवाडी (ता. शिरूर) येथे घडली.
साईशाला उलट्या होऊ लागल्याने तिच्यावर गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनतर साईशा हिला पुन्हा उलट्या होऊ लागल्याने तिला गावातील रुग्णालयात उपचार करत पुढील उपचारासाठी वाघोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच साईशाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अतूल पखाले हे करत आहेत.