Maharashtra Fort : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘या’ गड-किल्ल्यांचा समावेश?
१) साल्हेर
२)शिवनेरी
३)लोहगड
४) खांदेरी
५)रायगड
६)राजगड
७)प्रतापगड
८)सुवर्णदुर्ग
९)पन्हाळा
१०) विजयदुर्ग
११)सिंधुदुर्ग