पुणे : पुणे शहरात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दहा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पोटे, बापू मानकर, गणेश शेरला, गणेश घोष, स्वप्निल नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपने जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना विरोध केल्याने भर रस्त्यावर तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. निखिल वागळे हे कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना तब्बल चार ठिकाणी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चार ठिकाणी त्यांची गाडी देखील फोडण्यात आली. हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप आयोजकांसह निखिल वागळे यांनी केला होता.