सागर जगदाळे
भिगवण : राष्ट्रीय सेवा योजना ही महाविदयालयीन युवकांना खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम करते. युवकांना वैचारिक, शारिरिक, मानसिक कणखरबनविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या माध्यमातून होते. युवकांनी संकटाना कसे सामोरे जावे यांचे शिक्षण देणारी राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांवर खऱ्या अर्थाने श्रम संस्कार घडविणारी कार्यशाळाच आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार व संसदियकार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
शेटफळगढे(ता.इंदापुर) येथे भिगवण येथील कला महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबाराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. हनुमंत पाटील होते. तर इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पराग जाधव, माजी सभापती हनुमंत वाबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच शितल धुमाळ, इंदापुर बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मारुती वणवे, सरपंच प्रतिनिधी प्रा. तुषार क्षीरसागर, उपसरपंच प्रतिनिधी जावेद शेख, भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे, महाविदयालय विकास समितीचे रणजित भोंगळे, संपत बंडगर, सुनिल वाघ, उपसरपंच जयदीप जाधव, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. हनुमंत पाटील म्हणाले,युवकांच्या जीवनामध्ये अलिकडच्या काळात परिस्थितीने,व्यवस्थेने अस्थिरता निर्माण केली आहे. परंतू राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये प्रेरित झालेले व प्रेरित करणारे युवक असतात.राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना व समाजाला स्थिरता प्रदान करण्याचे काम करते त्याचा युवकांनी व ग्रामस्थांनी उपयोग करुन घेतला पाहिजे.
यावेळी विदयार्थिंनी अश्विनी शिंदे, शेटफळगढेच्या सरपंच शितल धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हनुमंत वाबळे, डॉ. हनुमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी, सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल
बनसोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. पद्माकर गाडेकर, डॉ. प्रज्ञा लामतुरे,प्रा. कविता देवकाते, प्रा. रणजित इनामके, अतुल गाडे व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शेटफऴ गढे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
सात दिवस चालणाऱ्या या शिबारामध्ये वृक्षारोपन, स्वच्छ भारत अभियान, मतदार नोंदणी, अक्षय उर्जा वापर जनजागृती आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिबारामध्ये डॉ. संजय मोरे,डॉ. प्रकाश पांढरमिसे, प्रा. बी.बी. खरात,डॉ. हेमंत गावीत, डॉ. श्रीराम गडकर, डॉ. राजाराम गावडे, प्रा. राजकुमार कदम यांची व्याख्याने व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. तसेच प्रा अनिल केंगार यांच्या भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.