पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच के. जे. सोमैया, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) विद्याविहार, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
अनंतराव पवार महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक (पुणे विभाग) म्हणून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रफुल्ल पाठक (संचालक,पावर सेक्टर स्किल कौन्सिल दिल्ली (NSDF)), नामदेव भोसले (सहसचिव, उद्योजकता व कौशल्य विकास विभाग मुंबई), राजशेखरन पिल्लई( कुलगुरू, सौमैया विद्याविहार मुंबई), शैलेंद्र देवळाणकर (संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन) यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यकता केंद्र), समीर सोमय्या (अध्यक्ष, सोमय्या विद्याविहार मुंबई) आणि डॉ. प्रज्ञा प्रभू (प्राचार्य, के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई) हे उपस्थित होते.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम, खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव व महाविद्यालायच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी डॉ. श्रीकांत देशमुख याचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. .