(Maharashtra Budget 2023) मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज (गुरुवारी) अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी अर्थसंकल्प (Maharashtra Budget )सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस विविध घोषणा करत होते. त्या दरम्यान एक घोषणा करताना सावध होत त्यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणीस यांचे नाव घेतले. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली. हा ‘पंचामृत’ध्येयावर आधारित असल्याचं सांगितलं.
पाच अमृत…
– भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
– रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
– शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
– महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास
– पर्यावरणपूरक विकास
शेवटी पाचवा अमृत वाचत असताना मात्र त्यांनी मी ‘पंचम अमृत’ कडे वळतो असे म्हणाले. आणि त्यावर स्वतःच मला सावधानतेनं बोलावं लागतंय. कारण अमृताकडे वळतो असे म्हणतोय. नाही तर लगेच काही अर्थ काढत बसाल, असे त्यांनीच दिलखुलासपणे सभागृहात सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून सभागृहात हशा पिकला.
अर्थसंकल्प सादर करताना हा अमृतकालातील पहिला अर्थसंकल्प हा ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे अर्थसंकल्प वाचताना फडणवीस यांनी या पाच मुद्यावरच अर्थसंकल्प वाचला. अर्थसंकल्प वाचायला सुरुवात करताना फडणवीस पहिल्या अमृताकडे वळतो असं म्हणाले होते. नंतरच्या प्रत्येकवेळी मात्र हुशारीनं शब्दबदल करत द्वितीय, तृतीय अमृताकडे म्हणत गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :