युनूस तांबोळी
शिरूर : राज्यात पक्षीय राजकारण होत असताना सगळ्याच पक्षात आंतरीक कलह होताना दिसून येत आहे. त्यामुळे आजच एखाद्या
पक्षात जाऊन राजकीय लढाई सुरू करावी. पण असे करणे म्हणजे ‘आगीतून निघून फुफाट्यात पडल्या सारखे आहे’. पक्ष संभाळण्यासाठी अस्थित्वाची लढाई म्हणून सध्या चिन्ह व पक्षासाठी भांडण सुरू आहेत.
त्यामुळे भविष्यात राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था निर्माण होईल. ते काहिही असले तरी पक्ष तर पक्ष किंवा लोकशाही क्रांती अघाडी किंवा एकलो चलो रे…म्हणत पण निवडणूक कोणतीही येऊ ‘मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार’ असे ठाम पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत सभापती पद तर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षात प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेले मंगलदास बांदल यांच्यांवर खंडणी व
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मागिल आठवड्यात त्यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार यासाठी शिरूर येथे पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिरूर मध्ये एवढ्या मोठी पत्रकार परिषद आयोजीत करण्याची ही पहिलीच वेळ होती.बांदल यांच्या विरोधात कारवाई करून त्यांना तुरूंगात पाठविणाऱ्या त्या सर्वांची नावे घेऊन व त्यांचे काळे उद्योग चव्हाट्यावर आणणार असल्याने या पत्रकार परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले होते. मात्र बांदल यांनी या पत्रकार परिषदेत कोणत्या पक्षात जाणार या बाबतची राजकीय भुमीका टाळली आहे.
आणि बांदल यांनी तरूंगातील प्रसंग व आलेले अनुभव यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, कारावासात अनेक सामाजीक, राजकीय, शैक्षणीक व प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाखती व अनुभव मिळाले. या काळात ऐतीहासीक घटना व ठिकाण जवळून पहाता आले. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन झाल्याने समाजात वावरण्याचा व संकटाना सामोरे जाण्याचा अभ्यास वाढला. व्यायाम केल्याने मधुमेहा सारखा आजार नाहिसा झाला.
त्यामुळे यापुढील काळात पुन्हा जोमाने शिरूर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होणार आहे. जुन्या काळात ज्यांनी राजकारणात मदत केली त्यांना सहकार्याची भुमिका असणार आहे. ते माझ्या नेहमी ह्रदयात राहतील. ज्यांनी माझा वापर करून मला या अवस्थेत सोडले. त्या राजकीय व्यक्ती माझ्या डोक्यात आहेत. अशी भूमीका मांडली.
दरम्यान, प्रत्येक राजकीय व्यक्ती आपल्या वारसासाठी राजकीय पद निर्माण करत असतो. त्यामुळे घोडगंगा सहकारी साखर कारखाना नव्याने तरूणाच्या हाती दिला यात नवल काय? मतदारांनी दिलेला हा कौल आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर तालुक्याचे सभापती पद मिळवित असताना विरोधात जाऊन, माझ्या सोबत राहून, टाकळी हाजीच्या श्री मळगंगा देवी कुंडात डुबकी घेऊन, माझ्या सोबत ठेवलेली निष्टा महत्वाची आहे. असे मला वाटते. शेतकऱ्यांना बाजारभाव तसेच सहकारी साखर कारखान्यात कारभारा बाबत असणारा पारदर्शी पणा हा माझा मुद्दा आहेच. गौनखनीजाबाबत प्रशासनाचे जे नियम असतील त्या प्रमाणे त्या प्रकरणाला सामोरे गेले पाहिजे. शिरूर तालुक्यातील राजकारणात लोकशाही क्रांती आघाडी मधून देखील निवडणूक लढवली असून सध्या तरी कोणत्या पक्षात जाणार या बाबत नक्की नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिखलात ‘कमळ’ फुलणार का ? पत्रकारांचा पलटवार
शिरूर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये राजकीय पटलावर ‘मंगलदास बांदल’यांनी नेहमीच वर्चस्व
मिळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश देखील मिळाले आहे. सध्या केंद्र व राज्यात भाजप ही सत्तेत आहेत. भाजपचे
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने तालुक्यात बांदल यांच्या मार्फत पुन्हा ‘कमळ’ फुलणार अशा वावड्या उठल्या होत्या.
त्यामुळे चिखलात कमळ फुलणार का ? असा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात पत्रकारांकडून विचारला गेला होता.
त्यावेळी बांदल म्हणाले की,सध्या जरी मी चिखलात असलो तरी हाथाने चिखल बाजूला करता येतो, घड्याळात वेळ काळ पाहून ठरवता येईल, धनुष्य बाणा ने निशाना साधता लक्ष ठरवता येईल, आणि तटस्थ भूमीका ठरविता येऊ शकेल. मी पैहलवान आहे ठाव पण टाकणार आणि घोबीपिछाड पण करणार.निवडणुकीच्या प्रक्रियेत राहून कृतीतून सर्वसामान्याच्या मदतीने निवडणुक लढवून दाखवणार आणि यशस्वी होणार.हे नक्कीच…!