अजित जगताप
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय प्रत्येक नागरिकांना हक्क दिला तसेच जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. त्या संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन लोकजनशक्ती एससी – एसटी सेल प्रदेश अध्यक्ष प्रेमानंद जगताप यांनी भीमवाडी, गवंडी येथे केले.
यावेळी साहित्यिक आनंद मस्के, सामाजिक कार्यकर्ते बबन गायकवाड, समाजसेवक सुरेश जाधव, समाजसेवक दिलीप गायकवाड, महाराष्ट्र लोकजनशक्ती एस सी, एस टी सेलचे संघटक आत्माराम आव्हाड, पोलीस निरीक्षक गवळी व मीना जाधव, आणि राणी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळ उभी करताना सुरुवातीला अपमान सहन करीत प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्याग केलेला आहे. पूर्वजांना मडके- खराटा घेतल्याशिवाय रस्त्यावरून चालता येत नव्हते. अशा लोकांच्या वारसांना सन्मान मिळवून दिलेला आहे. त्या सन्मानाचे प्रतीक म्हणून संविधान हे पूजनीय आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचा सन्मान राखणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यातून कधीही मागे हटणार नाही .असे श्री जगताप यांनी स्पष्ट केले.
सध्या गटातटाचे राजकारण होत असले तरी सर्वजण हे एकमेकांच्या सहकार्यासाठी प्रामाणिकपणे झटत आहे. कितीही प्रयत्न केला तरी संविधानाला धक्का लागणार नाही, असे आव्हाड म्हणाले. यावेळी छत्रपती शिवजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रीतमेचे पूजन करून जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमाला गोवंडी, भिम वाडी, देवनार परिसरातील आंबेडकर अनुयायांनी भेट दिली.