Uddhav Thackeray: मुंबईतील मात्रोश्री निवासस्थानवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या ड्रोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. या घटनेनंतर राजकारणात अनेक चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकांनी ड्रेन फिरत असल्याची माहिती वरिष्ठांना दिली. या संदर्भात मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान हे उच्च सुरक्षा झोन असल्याने याठिकाणी कोणतेही अनधिकृत ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास मनाई आहे. निवासस्थानी ड्रोन फिरत असल्याने ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवल्याचा आरोप होत आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
या संदर्भात मुंबई पोलिसांनी दिली माहिती

उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या संदर्भात मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. यावर त्यांनी अशी माहीती दिली की, हे ड्रोन अधिकृत एमएमआरडीएचे आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. या संदर्भात एमएमआरडीएने अधिकृत परवानगी घेतली होती आणि त्यानंतरच ड्रोन फिरवला. खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरातील सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात दोन ड्रोन यासाठी उडवण्यात आले होते.






