पुणे : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. सोमवारी राष्ट्रपती पदासाठी मतदान झाल्यानंतर लगेचच २० जुलै रोजी दोन्ही बाजूचे दहा ते १२ मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पावसाळी अधिवेशन लवकरच होत असून त्यात संबंधीत खात्याच्या मंत्र्यांची आवश्यकता असलेने त्या आधी मंत्री मंडळ विस्तार आणि शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला शिंदे गटातील ५ ते ६ आणि भाजपचे ७ मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर होणार असून तो दोन्ही पक्षातील इच्छुकांना वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मंत्री मंडळ बैठकींना उपस्थित राहणाऱ्या आमदारांना मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता असून त्याची पूर्व तयारी म्हणून त्यांना बैठकीला बोलावले जात असल्याची चर्चा आहे.