लोणी काळभोर (पुणे)- हवेली तालक्यासह संपुर्ण जिल्हाचे लक्ष लागुन राहिलेल्या कदमवाकवस्तीसह पुणे जिल्हातील 221 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन, येत्या २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार असुन, प्रत्यक्ष निवडणुक पुढील महिण्यातील १८ डिसेंबरला होणार असल्याचे निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केले आहे.
निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार असुन, १८ डिसेंबरला मतदान तर मतमोजनी २० डिसेंबरला होणार आहे. विशेष बाब म्हणजे निवडणुक जाहीर झालेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडही थेट जनतेतुन होणार आहे. दरम्यान 18 डिसेंबरला पुणे जिल्हातील ग्रामपंचायतींच्या बरोबरच राज्यातील तब्बल ७७२१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका होणार आहे. यामुळे याही निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणार आहेत.
निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाने-
उमेदवारी अर्ज स्विकारण्याची ताऱीख- सोमवार 28 नोव्हेबर ते शुक्रवारप 2 डिसेंबर या दरम्यान
उमेदवारी अर्जाची छाणनी- सोमवार 5 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस- बुधवार 7 डिसेंबर
निवडणुक-रविवार 18 डिसेंबर रोजी दिवसभर
मतमोजनी- मंगळवार 20 डिसेंबर..
निवडणुक होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे
हवेली – ७, आंबेगाव- २१, बारामती -१३, भोर -५४, दौंड -०८, इंदापूर – २६, जुन्नर – १७, खेड -२३, मावळ – ०९, मुळशी -११, शिरूर – ०४, वेल्हा – २८, एकूण – २२१
हवेली तालुक्यातील गोगलवाडी, आव्हाळवाडी, कदमवाकवस्ती, अहिरे, बुर्केगाव, पेरणे, पिंपरी सांडस, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
दरम्यान, हवेली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर मात्र सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष चित्तरंजण गायकवाड यांच्या पत्नी, गौरी गायकवाड या मागिल पाच वर्षापासुन सरपंच आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत गौरी गायकवाड थेट जनतेतुन मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या होत्या. याही निवडणुकीत चित्तरंजण गायकवाड स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असुन, त्यांना रोखण्यासाठी माजी सरपंच नंदु काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, माजी उपसरपंच ऋुषी काळभोर दंड थोपटुन तयार आहेत.