सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे. अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
परंडा तालुक्यातील शेतीची व खरीप पिकाची पाहणी खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर यांनी सोमवारी ( ता. २२ ) केली. यावेळी राजेनिबांळकर यांनी वरील सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके ,तालुकाप्रमुख मेघराज पाटील, उपविभागीय अधिकारी नरे, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, ,तालुका कृषी अधिकारी रुपनवर गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, उपअभियंता व्हनारे, बुध्दीवान लटके शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार राजेनिबांळकर म्हणाले कि,तालुक्यातील अनाळा, वाटेफळ, राजुरी, तांदुळवाडी
सिरसाव , जवळा (नि .), वाटेफळ, कौडगाव ,आसू येथील शिवारात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाधीत झालेल्या पिकाना सर्व निकष सर्वत्र लागू करून एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असुन त्यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक मदत होईल अशी भूमिका संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवावी असे खासदार राजेनिबांळकर यांनी सांगितले.
दरम्यान, शासनाने घोषणा केल्याप्रमाणे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना आर्थीक मदत देण्याची मागणी लातुर व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्यास शेतकऱ्यांचा असंतोष सरकारसमोर मांडणार आहे. असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगीतले. तसेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपळर वर फोटो व सातबारा अपलोड करावे व सतत च्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा. व पोहच घ्यावी. असे अवाह निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.