Sushma Andhare news : बीड : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे. बीड मध्ये हा प्रकार घडला आहे. मारहाण केल्याची स्वतः जाधव यांनी एका व्हिडिओ मार्फत कबुली दिली आहे. या घटनेनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Sushma Andhare beaten by leader of Thackeray group)
बीडमधील धक्कादायक प्रकार; राजकारणात खळबळ
जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अनेक गंभीर आरोप सुद्धा केले आहे. त्याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केल्या आहे. त्यामध्ये ते म्हणाले, बीडमध्ये ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेचं आयोजन कऱण्यात येत होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत. (Sushma Andhare news ) शनिवारी ही सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह उपनेत्या सुषमा अंधारे देखील आल्या होत्या. त्या सध्या जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे मागत आहेत. एसी, सोफ्यासाठी हे पैसे त्या मागत आहेत.
त्या माझ पदही विकायला लागल्या आहेत. (Sushma Andhare news ) मी पक्ष वाढीसाठी अत्यंत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वादात मी त्यांना दोन चापटा मारल्या. अशी कबुली बीडमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. असे गंभीर आरोप जाधव यांनी केले आहेत.