दिल्ली : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून. सर्व पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवारांनी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याची सद्या जोरदार चर्चा सुरु आहे. “एकनाथ शिंदे-शरद पवार यांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहित?.” पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक संवादामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, “आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मंत्र्यांना भेटत असतो. मंत्र्यांकडे सामाजिक काम घेऊन जातो. मी दिल्लीत असताना दोन ते तीन मंत्र्यांना भेटते. यामागे कुठला अजेंडा नसतो. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांमधून निवडून आलो आहोत”
हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे..
“उद्धव ठाकरे सुस्कृंत नेते आहेत. अतिशय चांगल्या वातावरणात एक कुटुंब म्हणून उद्धवजींसोबत काम करताना कधीही दडपण आलं नाही. हसत, खेळत चांगल्या वातावरणात आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच पुढल्या त्या म्हणाल्या कि “उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कौतुक केलं, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना कधीच दडपण आले नाही. आजही शिवसेनेचा छोटा मोठा कार्यकर्ता आमच्यासाठी प्रियच” असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
शेवटी त्या भारताच्या लेकीने जग गाजवलं..
“काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या ईडी सीबीआयच्या 95 टक्के केसेस या विरोधी पक्ष नेत्यांवर झाल्या. याचा डेटा प्रसिद्ध झाल्यावर त्याबाबत मी लोकसभेत निवेदन केलं” असं त्या म्हणाल्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती गटातून फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटच सुद्धा सुप्रिया सुळे यांनी यावेळी कौतुक केलं. “विनेश फोगाटच यश हा सत्याचा विजय आहे. शेवटी त्या भारताच्या लेकीने जग गाजवलं. याचा आम्हाला अभिमान आहे” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.