हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यातील सर्वात “श्रीमंत” अशा कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या पाच वर्षापुर्वी मिळालेल्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा आपल्याच हाती ठेवण्यासाठी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील “नवपरिवर्तन पॅनेल” रिंगणात उतरला आहे. तर पाच वर्षापुर्वी गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या हातात गेलेल्या सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्याच हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “जनसेवा पॅनेल” रिंगणात उतरला आहे.
सरपंच पद हे मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाने यंदाही थेट जनतेतुन निवडले जाणार असल्याने, सरपंचपदासाठी “नवपरिवर्तन पॅनेल” च्या वतीने पॅनेल प्रमुख चित्तरंजन गायकवाड तर विरोधी जनसेवा पॅनेलच्या वतीने, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी कल्पना काळभोर या दोन तुल्यबळ उमेदवारांत थेट सत्तेची लढाई रंगणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी पस्तीस उमेदवार रिंगणात असुन, नवपरिवर्तन व जनसेवा या दोन्ही पॅनेलच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ उद्या (शुक्रवारी) सायंकाळी होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग भरणार आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षासाठीचे सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असुन, मागील निवडणुकीप्रमानेच यंदाही सरपंच हा थेट जनतेतुन निवडला जाणार आहे. सरपंचपदासाठी नवपरीवर्तन पॅनेलचे उमेदवार म्हणुन चित्तरंजन गायकवाड तर विरोधी जनसेवा पॅनेलच्या वतीने कदमवाकवस्तीचे विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या पत्नी कल्पना काळभोर यांच्यात थेट लढत होणार आहे. चित्तरंजन गायकवाड यांच्या नवपरीवर्तन पॅनेलसाठी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच गणपत काळभोर, माजी उपसरपंच देविदास अण्णा काळभोर, अशोक कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रितम गायकवाड, बाळासाहेब गुजर, दत्तोबा काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, रमेश कोतवाल, अशोक शिंदे, वसुंधताई केमकर, रुक्मिणी चांदणे, राजेंद्र काळभोर आदी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
दुसरीकडे जनसेवा पॅनेलसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्यासह साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील नाना कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, प्रितम काळभोर, राजेश काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, देविदास कदम, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, नेहा चव्हाण दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर आदी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
निवडणुकीबाबत बोलतांना नवपरीवर्तन पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड म्हणाले, मागील पाच वर्षात नव्वद कोटीच्या पाणीपुरवठा योजनेसह शंभर कोटीहुन अधिक रकमेची विविध विकासकामे ग्रामपंचायत हद्दीत झालेली आहेत. ही विकासकामे जनतेला दिसत असल्याने, मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार यात आम्हाला काहीही शंका नाही. पाच वर्षात मतदारराजाने त्यांच्या अडचणी अथवा समस्येबाबत केलेल्या प्रत्येक फोनला कामाच्या माध्यमातुन उत्तर दिलेले आहे. तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक नागरीकाला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न राहिलेले आहेत. आमच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील पाच वर्षात महिलांच्यासाठी केलेले काम, या निवडणुकीत आम्हाला जिंकुन देणार आहे. यामुळे सरपंच पदाबरोबरच आमचे सतराच्या सतरा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील यात कोणतीही शंका नाही.
निवडणुकीबाबत बोलतांना जनसेवा पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर म्हणाल्या, नव्वद कोटींची पाणीपुरवठा योजना ही शिरुर-हवेलीचे कार्यसम्राट विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातुन मंजुर झालेली आहे. ही योजना मंजुर करुन घेण्यासाठी नंदु काळभोर, बाबासाहेब काळभोर, ऋुषी काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांचा पाठपुरावा कामी आलेला आहे. यात विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांचा वाटा किती आहे हे शोधावे लागेल अशी परीस्थिती आहे. ग्रामपंचायत शहरालगत असल्याने, ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. जनतेचा मिळणारा प्रतिसाद व आमच्या नेतेमडळीमधील एकी पहाता, आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडुन येतील असा विश्वासही कल्पना काळभोर यांनी व्यक्त केला.
प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे :
प्रभाग क्रमांक १ : आकाश धनंजय काळभोर, सिमिता अंगदराव लोंढे, कोमल सुहास काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), अर्चना हेमंत टिळेकर, नेहा बाबासाहेब चव्हाण, विशाल विठ्ठल गुजर (जनसेवा पॅनेल)
प्रभाग क्रमांक २ – बिना तुषार काळभोर, मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, राजश्री उदय काळभोर, (नवपरिवर्तन पॅनल), रेश्मा नंदकुमार काळभोर, शीतल नितेश लोखंडे, स्मिता निलेश काळभोर (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ३ – दीपक नवनाथ अढाळे, सुनंदा देविदास काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), शहाजी कांतीलाल मिसाळ, संगीता राजाराम दळवी (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ४ – नासीरखान मनुलाखान पठाण, अभिजित रामदास बडदे, रुपाली सतीश काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), बिस्मिला शमी शेख, नंदू कैलास काळभोर, दत्तात्रय भिमराव वाघमारे (जनसेवा पॅनेल)
प्रभाग ५ – स्वप्नील शिवाजी कदम, अविनाश विजय बडदे, सोनाबाई अशोक शिंदे (नवपरिवर्तन पॅनल), स्मिता गुरुदत्त काळभोर, मयूर सुरेश कदम, अमित वसंत कदम (जनसेवा पॅनेल),
प्रभाग क्रमांक ६ – योगेश भाऊराव मिसाळ, सलीमा कलंदर पठाण, राणी प्रितम गायकवाड (नवपरिवर्तन पॅनल), श्रीकांत नारायण भिसे, अर्चना श्रीकांत कदम, मनीषा राजेश काळभोर, (जनसेवा पॅनेल), रुपाली अविनाश कोरे (स्वतंत्र)