हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : “आगामी काळात येवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना कार्यकर्त्यांनी पुर्ण क्षमतेने लढवाव्यात. शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना पुर्ण ताकद दिली जाईल. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाची ताकद दाखवा,” असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये हवेली तालुका शिवसेना, युवसेना, महिला आघाडी व इतर सर्व अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी यांची आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. ०८) करण्यात आले होते. यावेळी सचिन अहिर बोलत होते.
यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माऊली कटके, उपजिल्हाप्रमुख काळूराम मेमाणे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम, रमेश भोसले, जिल्हा समन्वयक उर्मिला भुजबळ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख जयश्री पलांडे, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर, युवाध्यक्ष मच्छिंद्र सातव, युवासेना तालुका प्रमुख प्रताप कांचन, तालुका संघटक छाया महाडिक, तालुका समन्वयक अलका सोनावणे, तालुका संघटक तानाजी कुंजीर, तालुका सल्लागार ज्ञानेश्वर माथेफोड, सुभाष कुंजीर विजय बगाडे, श्रीकांत मेमाणे, पारस वाल्हेकर, बाळासाहेब कांचन, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल काळभोर, मयूर गोते, लालासाहेब तुपे, श्रेयश वलटे, आदि मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना अहिर म्हणाले, “नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, तसेच चर्चे दरम्यान सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून परिपूर्ण प्रयत्न करु, अशी ग्वाहीही अहिर यांनी दिली.” या आढावा बैठकीत जिल्हा परिषद गटानुसार कार्यकर्त्यांची मते व विचार ऐकून घेतले.