(Maharashtra Budget 2023) पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन जुन्नरला बिबट सफारी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या ट्विटमुळे संभ्रमही निर्माण झाला होता. बारामती आणि जुन्नर दोन्ही ठिकाणी बिबट सफारी सुरु होणार का? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.
जुन्नरला बिबट सफारी…!
बिबट्यांचे मुक्या जनावरांचे वाढते हल्ले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच दिवसादेखली रस्त्यावरच काय घराच्या बाहेर निघण्यास येथील नागरिकांचे धाडस होत नाही. अशी दहशत या तालुक्यात पसरली आहे. त्यामुळे बिबट्यांच्या मुक्त वावरावर आवर घालण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखरे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन जुन्नरला बिबट सफारी होणार असल्याची माहिती आता वास्तावात उतरणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. आज (गुरुवारी) अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी बिबट सफारी सुरु करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे येथील नागरिक सुखावले आहेत.
जुन्नरच्या बिबट सफारीवरुन मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. बिबट सफारी जुन्नरमध्ये होणार की बारामतीत होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता बिबट सफारी जुन्नरमध्येच होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे.
बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. मात्र त्यानंतर जुन्नरचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांनी विरोध केला होता. त्यानंतर बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Maharashtra Budget 2023 : शिंदे सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली!
Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार;!