सातारा : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण व युवकांना विधायक उपक्रमातून एकत्र केले आहे. त्यांना रॉयल कारभार ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभरच्या शाखेतून सामाजिक कार्यातून आदर्श कार्य होत आहे असे प्रतिपादन रॉयल कारभार ग्रुपचे सर्वसर्वा सौरभदादा जाधव यांनी केले आहे.सातारा-सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मेळाव्यात ते विश्राम बाग, सांगली येथे बोलत होते. यावेळी रॉयल कारभार ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयघोषाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
महाराष्ट्रात अल्पावधीत सर्व जाती धर्मातील युवक व तरुणांना सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण देण्यात आली आहे. निर्व्यसनी व लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या तरुण पिढीला आता सामाजिक कार्यकर्ते अशी नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी रॉयल कारभार ग्रुपने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उर्वरित महाराष्ट्रात शाखा उभारणी केली आहे. चांगल्या गोष्टी करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे. त्यांचा योग्य वापर होत आहे.
‘जातपात तोडो, सब आदमी को जोडो”हम सब एक है। असा नारा देत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रॉयल कारभाराचा समतेचा झेंडा हाती घेतला आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, दलित सब हमारे भाई भाई,”ना बी सी, ना ओ बी सी, ना सर्वण हम सब हिंदुस्थानी’ असा नवीन नारा दिल्याने सर्व जाती धर्माचे तरुण स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, नैसर्गिक आपत्ती आली असताना मदतीचा हात पुढे करून सामान्य माणसाला जगण्याची उमेद दिली आहे.
दुर्घटना घडली की, धावून जाणारे कार्यकर्ते यांची सामाजिक नाळ जोडली गेली आहे. राजकारणाचे जोडे बाहेर काढूनच रॉयल कारभार ग्रुप सौरभदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच करीत आहेत. नव्याने शाखा स्थापन करण्यासाठी अनेकजण संपर्क साधून विचारणा करीत आहेत.
दरम्यान, सातारा ,सांगली ,सांगोला ,सोलापूर ,कोल्हापूर, नवी मुंबई, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, नागपूर अशा अनेक जिल्ह्या तालुका व शहरात रॉयल कारभार ग्रुपच्या शाखा कार्यरत आहेत. संपर्क प्रमुख – सुरज पाटोळे ,नरेंद्र पाटील ,शोएब मुल्ला ,अनिकेत बाबा ,विकास गायकवाड ,प्रेम वाईकर, रोहित देशमुख, जयप्रकाश मेटकरी, हणमंत काळे, ओमकार वाघमोडे, प्रशांत शेडगे
सांगली जिल्हा प्रमुख -आयुब शेख ,प्रशांत साळुंखे ,केतन साळुंखे , सुजित चव्हाण , सागर चन्ने , करन चव्हाण व मान्यवरांनी नेहमीच सहकार्य केल्याने रॉयल कारभार ग्रुपच्या रोपट्याचा वटवृक्ष बनला असल्याचा दावा यावेळी सौरभदादा जाधव यांनी केला आहे.