लोणी काळभोर, (पुणे) : थेऊरफाटा (ता. हवेली) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संदीप सुखराज धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी गोरखनाथ आंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ०४) हि निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी संदीप धुमाळ व संभाजी आंबेकर यांचा अनुक्रमे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी अध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी आंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. सचिव ज्ञानेश्वर धुमाळ यांनी शासकीय कामकाज पाहिले.
यावेळी नूतन संचालकपदी सचिन तुपे, महादेव धुमाळ, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, अजय कुंजीर, सुनीता धुमाळ, वैशाली मेमाने, राजेंद्र गायकवाड, उमेश राखपसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर तज्ञ संचालक पदी पोपट चौधरी व दत्तात्रय कुंजीर तसेच कार्यकारी संचालक म्हणून ज्ञानेश्वर धुमाळ यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, संस्थेचे एकूण सभासद १८३० असून, संस्थेच्या ठेवी ३४.४८ कोटी आहेत. संस्थेचे एकूण खेळते भांडवल ४९.७९ कोटी असून संस्थेने १४ टक्के लाभांश वाटला आहे. संस्थेस सतत ऑडिट वर्ग “अ” आहे. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ सांभाळत आहेत.
याबाबत बोलताना संदीप धुमाळ म्हणाले, “हवेली तालुक्यातील श्रीनाथ पतसंस्था एक अग्रगण्य पतसंस्था आणि आधुनिकतेची कास धरणारी आणि स्वच्छ, पारदर्शक आणि शिस्तप्रिय संस्था म्हणून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. भविष्यात संस्था सभासदाच्या आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावला जाईल. तसेच युवा व्यवसायिकांना व्यवसाय करिता आर्थिक मदतकरण्याकरीता कटिबद्ध आहे. सर्व संचालकांना सोबत घेऊन सभासदांच्या हिता चे निर्णय घेण्यासाठी बांधील आहे.