हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सुरु असलेल्या नवीन मुळा-मुठा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करावे असे निवेदन पूर्व हवेलीतील नागरिकांनी माजी जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात सुरु असलेल्या नवीन मुळा-मुठा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम झाल्यास परिसरात असलेल्या रोपवाटिका व्यावसायिक, शेतकरी व शेतीपूरक व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. अस्तरीकरण झाल्यास पूर्व हवेलीतील गावांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबवावे या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, उरुळी कांचनचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष अलंकार कांचन, आळंदी म्हातोबाचे ग्रामपंचायत सदस्य पारस वाल्हेकर, अजिंक्य चौधरी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हरीश कांचन, विभाग प्रमुख सागर फडतरे, हवेली वैद्यकीय कक्ष प्रमुख अभिषेक पवार, शिंदवणे येथील ग्रामपंचायत सदस्य सागर खेडेकर, आप्पासाहेब गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, माजी आमदार विजय शिवतारे यांनी तात्काळ फोनवरून करून काम थांबवण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या तसेच ही माहिती त्वरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. याबाबत उपस्थित नागरिकांनी शिवतारे यांचे आभार मानले.