अजित जगताप
सातारा : राज्यातील माथाडी कामगार नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विधानपरिषद सदस्य आ शशिकांत शिंदे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यास त्यांना मिठ्ठी मारून स्वागत करू असे शिवसेना बंडखोर आ. महेश शिंदे यांनी सांगितले. ही ऑफर धुडकवित आ. शिंदे म्हणाले, श्री शरद पवारसाहेब दैवत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणे कदापि होणार नाही असे स्पष्ट केले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांची कामे होत नाहीत. विकास निधी शिवसेनेचे बंडखोर आ महेश शिंदे यांना मिळत नसावे त्या अर्थाने त्यांनी असे वक्तव्य केले असावे अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आ. शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सातारा जिल्ह्यातून मी हालत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून मी कदापि कुठे ही जाणार नाही.होते ते चांगल्यासाठीच होत आहे. गद्दारी माझ्या रक्तात नाही. या पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने झटणारा आहे. असा त्यांनी नम्रपणे खुलासा केला.
कोरेगाव, सातारा-जावळी, माण-खटाव, पाटण मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी कार्यक्रम वेगाने सुरू आहे. ज्यांनी पक्ष व गट बदलला आहे. त्यांना पुन्हा निवडून येणे अशक्य आहे. अशी सातारा जिल्ह्यात परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील काही मंडळी शिवसेना सोडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे. त्यांनी कधीही शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत.निवडणुकीत कधी ही विजयी होता आले नाही. शिवसेना पदामुळे ते मोठे वाटत होते. आता ते सामान्य शिवसैनिकांना खुजे व लहान वाटत असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आ. शशिकांत शिंदे यांच्या भूमिकेचे महाविकास आघाडीच्या मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे.
दरम्यान, आ महेश शिंदे यांची राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर भाजप व शिवसेना अशी त्रिकोणी झाली आहे. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. चौकोण पूर्ण केला असला तरी सध्या त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतेय का? हे पाहणे औचित्य ठरणार आहे.