लोणी काळभोर, (पुणे) : शिंदे गटाचे नेते रामदास कदमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आंदोलन करण्यात आले.
“या रामदास कदमाचे करायचे काय खाली डोके वर पाय”, “पन्नास खोके एकदम ओके”, “निम का पत्ता कडवा है रामदास कदम भडवा है” “पन्नास खोके माजलेत बोके”. अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारुन जाळून टाकण्यात आले.
शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर म्हणाले, “रामदास कदम याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपल्या गटारासारख्या तोंडातुन जी गरळ ओकली आहे. त्याचा हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, पुणे जिल्हा संघटक रमेश भोसले, तालुका संघटक तानाजी कुंजीर, तालुका सल्लागार ज्ञानेश्वर माथेफोड, गाव शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, विभाग प्रमुख ओम काळभोर, सुभाष कुंजीर, राम गावडे, युवासेना विभाग प्रमुख अजय माने, माजी विभागप्रमुख राजेंद्र जोशी तसेच शाखाप्रमुख शिवाजी काळभोर, सागर राखपसरे, पिंटू पाटील, युवराज माने, बबलू राऊत, गणेश काळभोर, अक्षय बिरादार आदी शिवसैनिक उपस्थित होते.