पुणे : शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहा. असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी दिली आहे.
जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांनी नुकतीच मात्रोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ मनाळे, राजेंद्र बाबर, तानाजी लोणकर, भरत चौधरी, गंगाधर बधे, दत्ता घोडके, विकास भदे, नितीन गावडे, अनिकेत सपकाळ ,बाबू काळे, दत्ता खवळे, कबीर शितोळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सगळ्यांना वाटत होते की, आता शिवसेनेचे काय होणार? पण शिवसेनेचे काय होणार? याचे उत्तर मिळण्याआधीच शिवसेना दहा पावले पुढे गेली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी हिंदूहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून दसरा मेळाव्यासंदर्भात सुरू असलेल्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पडदा पडला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला नेमकी कुणाला परवानगी मिळणार? असा वाद सुरू होता. मुंबई महानगर पालिकेनं शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनाही ही परवानगी नाकारली. अखेर उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावलं असून अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचेही ताशेर ओढले. शेवटी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी देण्यात आली. शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.