Shard Pawar मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, या कार्य़कर्त्यांनी आंदोलन करत आहेत. त्यावर पवारांनी त्यांची भेट घेत सुचक वक्तव्य केले आहे.
तुम्ही असा निर्णय घेऊ दिला नसता…!
यशवंतराव चव्हाण सेंटर समोर कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून बसले आहेत. त्यांची आज शरद पवारांनी भेट घेतली. यावेळी पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्षातील नेत्यांना आणि कार्य़कर्त्यांना विश्वासात घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेयला हवा होता. मात्र तुम्ही असा निर्णय घेऊ दिला नसता. एक ते दोन दिवस निर्णय घेतला जाईल, असे सांगत शरद पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
राज्याभरातून आपण आला आहात. मी जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. नवीन नेतृत्व पुढे यावे, असा हेतू आहे. ही गोष्ट खरी आहे की राजीनामा देताना विश्वासात घेयला हवे होते. मात्र तुम्ही होकार दिला नसता. माझ्या निर्णया विरोध करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन देखील सहकारी आले.
मी अंतिम निर्णय योग्य निर्णय घेवू. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्ष केली जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पवार आता पुन्हा अध्यक्षपदी बसणार का ? याची उत्सुकता वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!