Sharad Pawar News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी निर्णय मागे घेतला. पुढे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मला विरोधीपक्षनेतेपद नको, मी पक्षसंघटनेत काम करण्यास तयार आहे. अन्य कोणत्याही पदाची जबाबदारी मी घेऊ इच्छीतो… असे मत व्यक्त केले. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? अशी जोरदार चर्चा रंगली. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.(Sharad Pawar News)
पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, “विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. मात्र, आता हे पुरे झाले. (Sharad Pawar News)पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या”, असं अजित पवारांनी बुधवारी आयोजित कार्यक्रमात म्हटलं. त्यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे तर्क-वितर्कांना उधाण आलं.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख प्रदेशाध्यक्षपदाकडे आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात कोणती जबाबदारी कोणाला द्यावी याचा निर्णय मी एकटा घेत नाही. अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्यासंदर्भातला निर्णय घेतील. आज पक्षसंघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे. (Sharad Pawar News)
यावेळी बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. पाटण्यामध्ये विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. (Sharad Pawar News) यावरून बैठकीवर भाजपनं हल्लाबोल केला होता. या टीकेला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांच्या बैठकीवर सत्ताधारी उगाच टीका करतात. विरोधक बैठका घेऊ शकत नाहीत का, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच पाटण्याच्या बैठकीमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी भगिरथ भालके हे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएसला राज्यात प्रतिसाद मिळेल की नाही हे भविष्यात कळेल. वेगळ राजकीय चित्र दाखवण्याचा केसीआर यांचा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar News)