Sharad Pawar News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा दिलेला नाही. या सर्व घडामोडींनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Sharad Pawar News)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
शरद पवार यांनी ट्विट करून सांगितले की, “मी अजूनही खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा मला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. (Sharad Pawar News)राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळ यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाहीये.(Sharad Pawar News)