Political News : परभणी : राष्ट्रवादीतून बंड करून अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे बदलत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी अजित पवार यांनी सहकाऱ्यांसह शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली. अजित पवार गटाकडून शरद पवार यांनी भाजपसोबत येण्यासाठी मनधरणीचा प्रयत्न केला जात आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सूचक विधान केले असून, या विधानाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.(Political News)
अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. शरद पवार भाजपसोबत येणार का? असा सवाल बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा, तुम्हाला वेगळे चित्र दिसेल.” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आले आहे.(Political News)
राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. मात्र, हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.(Political News)
दरम्यान, अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्यामुळे या विधानाला पुष्टी मिळत आहे. सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. काळाच्या ओघात याची उत्तरे मिळतील असे सूचक विधान अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी केले आहे. याआधीही अजित पवार गटाने मुंबईत शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. तेव्हाही अशाच चर्चांना उधाण आले होते.(Political News)