अजित जगताप
सातारा :Satara- वडुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले पण, अर्ज माघारी घेण्यासाठी नाराजीचे सूर बदलला. (Satara) त्यामुळे निवडणुकी शिवाय पर्याय राहिला नाही. असे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सांगितले. (Satara)
खटाव तालुक्यातील वडुज येथे भाजीपाला, पुसेगाव येथे कांदा, व पूसेसावली भुसार व्यवसाय निमित्त वडूज, पुसेगाव, पुसेसावळी बाजार जोमाने सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. सदरची बाजार समिती तीन वर्षात सुरळीत होती ती आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात सहकार वाढीसाठी प्रयत्नशील आहे. खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सुस्थिती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. १९७२ केशवराव पाटील, संभाजी राव घाडगे, ध्येयशील देशमुख यांनी वडूज येथे सात एकर, पुसेसावळी येथे पाच एकर व उप बाजार समिती स्थापन केली होती. त्यानंतर, एक गुंठा जागा घेता आली नाही. ही खंत घार्गे यांनी व्यक्त केली.
बाजार समितीची निवडणूक माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या नेतृ्वाखालील लढवली जाणार आहे.
यावेळी रणजीत देशमुख, ध्येयशील कदम, डॉ. सुरेश जाधव, धनजंय चव्हाण, राहुल पाटील, रणजीत जाधव, अशोक कुदळे, डॉ दिलीप येळगावकर, डॉ महेश गुरव, नवल थोरात, राजू भैय्या मुलाणी, अमरजित कांबळे, विजयकुमार शिंदे, अशोक गोडसे यांना ही भूमिका मान्य असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
दुष्काळी भागातील वडुजनगरीत बहरतोय पेरू…!
Vaduj News : वडुज येथे जन औषधी दिन, महिला दिन व मनसे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न …!