अजित जगताप
Satara Political News : सातारा : विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापनेबाबतचा घोळ त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे वीस जणांच्या मंत्रिमंडळाची स्थापना आणि आता त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्तमेढ रोवली गेली. यामध्ये सातारा जिल्ह्याला आणखीन एक मंत्री पदाची लॉटरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. (Satara district will get a tilt in the expansion of the state cabinet ??)
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा सरकार म्हणून या राज्य सरकारची नोंद झालेली आहे. पूर्वी भाजप-सेना व राष्ट्रवादी व काँग्रेस मित्रपक्ष अशी सरकार स्थापन करण्याच्या खेळ खेळून झाल्यावर काटावरच्या अपक्ष आमदारांची नोंद घेतली जात होती. पण सध्या राजकारणातील बदल हे निसर्गालाही लाजवेल असे होऊ लागलेले आहे. (Satara Political News) राजकीय शत्रू मित्र झाले तर मित्र शत्रू होऊ लागलेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत होता. आता मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सुचिन्ह दिसू लागलेली आहेत.
शिवेंद्रराजे की जयकुमार गोरे?
माण- खटाव चे भाजपचे आमदार जयकुमार गोरे व सातारा -जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यापैकी एकाचे नाव निश्चित झाले असले तरी मंत्री पदाची लॉटरी सातारा जिल्हाला लागल्याचे समाधान आतापासूनच व्यक्त केले जात आहे. आगामी २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आक्रमक चेहरा मंत्रिमंडळात असेल तर प्रचारांमध्ये रंगत येणार आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष पद भूषवणारे व दुष्काळी भागाचे नेतृत्व करणारे माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पारडे चांगलेच जड झाले आहे. (Satara Political News) भाजपच्या कोट्यातून त्यांना हिरवा सिग्नल मिळत असला तरी त्यांचा भाजप कशा पद्धतीने मंत्रिमंडळ उपयोग करेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सातारा जावलीच्या गड अभेद ठेवणारे आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले हे सध्या राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचा शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये समन्वय साधणारे मंत्री असावे. असे पक्षश्रेष्ठींनी संकेत दिलेले आहेत. भाजपच्या गोटातून आमदार जयकुमार गोरे, गणेश नाईक, शिवेद्रसिंहराजे भोसले ,प्रशांत ठाकूर , आशिष शेलार, मनिषा चौधरी, मंदा म्हात्रे तर शिंदे गटातून आ. भरत गोगावले, शहाजी बापू पाटील, संजय शिरसाठ, सदा सरवणकर, अनिल बाबर, दिलीप लांडे, यास्मिनी जाधव, प्रकाश आंबिटकर यांचे सध्याचे नाव चर्चेत आहे. (Satara Political News)
मंत्री मंडळ इच्छुकांनी दिल्ली- मुंबई वारी करून अंदाज घेतलेला आहे. भाजप व शिंदे गटाच्या पक्ष नेतृत्वाकडून समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्यांना मंत्री केले तर भविष्यात पक्षही वाढणार आहे. आणि सरकारी मजबूत होणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. (Satara Political News) महाराष्ट्राच्या सीमा लगत असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यामुळे काँग्रेसचे वजन वाढलेले आहे. त्यामुळे काँग्रेसला शह देणाऱ्या शिंदे गट व भाजपच्या मंत्र्यांना काम करण्याची चांगली संधी आहे .राजकारणामध्ये काही बदल होतात.हे बदल अपेक्षित असले तरी मंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना संयम राखवा लागणार आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारातून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे तसेच जातीचे समीकरणही डोळ्यासमोर ठेवून निवड केली जाणार आहे. सध्या भाजपची धुरा ही नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विचारावर चालू आहे. (Satara Political News) तशाच पद्धतीने दीपक केसकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शंभूराजे देसाई अशा मंत्र्यांच्याही राजकीय पटलावरील निर्णयाचा विचार होणार आहे. त्यामुळे मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट सांगणे वरिष्ठ नेत्यांनाही अवघड झाले आहे. तरी ही काही नावे चर्चेत आल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Political News | सेना- भाजपचे निष्ठावंत सरकारच्या कार्यपद्धती गतिमान करण्याच्या प्रतीक्षेत…!
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…