Satara News : सातारा : अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा सर्व ताकतीने मैदानात उतरले आहेत. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून, कराडमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली. या वेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवार यांना अजित पवार यांचं बंड म्हणायचं का आशीर्वाद? असा प्रश्न विचारला. यावर पवार म्हणाले, की आम्ही कुणाच्याही अपात्रतेच्या कारवाईमध्ये जाणार नाही. (Satara News) माफ करा; पण क्षुद्र बुद्धीची व्यक्ती असेल तरच आशीर्वाद देईल, त्याला एवढं समजत नाही. मी जाहिरपणाने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय, पक्षाच्या बांधणीसाठी. त्यावेळेला पत्रकार परिषदेत आशीर्वाद शब्द वापरून एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका, अशी माझी विनंती आहे, अशा शब्दात पवारांनी पत्रकाराची कानउघाडणी केली.
दरम्यान, शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार असून, पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात घेणार असून, दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. (Satara News) या दौऱ्याची सुरुवात शिवनेरीपासून करणार असून, शेवट रायगडवर करणार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, मग भाजपसोबत का नाही, या अजित पवारांच्या वक्तव्याचा खुलासा शरद पवार यांनी केला. अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे. आणीबाणी जेव्हा देशात लागू झाली होती, अनेक राजकीय पक्ष आणि मीडियाने इंदिरा गांधी यांच्यावर अत्याचार केला होता. (Satara News) इंदिरा गांधी यांनी योग्य काम केलं हे सांगणारे फक्त बाळासाहेब ठाकरे होते आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली शिवसेना एकच असा पक्ष होता त्याने एकही उमेदवार दिला नव्हता, इंदिरा काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज काही घडतंय, आम्ही काही वेगळं करतो असं नाही. काल ज्यांनी शपथ घेतली त्यावेळी शिवसेना सोबत असताना शपथ घेतली होती. त्यामुळे शिवसेनेसोबत गेला हे काही कारण नाही.
या वेळी शरद पवार यांनी राज्य सरकारी बँक आणि पाटबंधारे धोरण याबद्दल सांगितलं. (Satara News) यातील काही आरोप हे खुद्द पंतप्रधानांनी केले होते. आता या सगळ्यातून पंतप्रधान मोदींनीच निर्दोष सिद्ध केलं याबद्दल मी आभारी आहे, असे सांगितले. तसेच ईडी आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : हृदयद्रावक! महाबळेश्वरला फिरायला गेले असताना दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू