दिनेश सोनवणे
दौंड : मळद (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अॅड. मोहिनी बापुराव भागवत यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली आहे.
यापूर्वीचे सरपंच रेश्मा घागरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी एम एन नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (ता.२८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पार पडली. या निवडणूक सरपंचपदासाठी मोहिनी भागवत यांचाच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नेवसे यांनी सरपंच पदी अॅड. मोहिनी भागवत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामसेविका कोमल खोमणे यांनी शासकीय कामकाज पहिले.
दरम्यान, सत्ताधारी गटाला काठावरचे बहुमत असल्याने सरपंच पदाची निवड चुरशीची होईल. अशी चर्चा गावात रंगली होती. मात्र मोहिनी भागवत व त्यांचे पती बापुराव भागवत यांचा गावातील संपर्क आणि दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कूल यांचे निकटचे संबंध असल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे दिसून आले आहे.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच अॅड. मोहिनी भागवत म्हणाल्या, “मळद गावच्या उर्वरित विकासासाठी गट- तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे. तसेच पंचायती मधील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.