राहुलकुमार अवचट
Sanjay Raut यवत : भीमा पाटस सहकारी कारखान्याचा कोणी स्वतःला बाप मानत असेल तर खोटा बाप आहे. खरे मालक तर तुम्ही आहात. राज्यातल्या भ्रष्टाचारचे भीमा पाटस हे सहकार क्षेत्रातीले सगळ्यात मोठे प्रकरण आहे. असे सांगत भ्रष्टाचार न करणाऱ्या राजकीय नेत्याला भाजपात स्थान नाही. असा टोला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी लगावला.
भीमा पाटस सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील वरवंड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.
यावेळी रायगड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सायली दळवी, शरद कोळी, संजय मोरे, अनिल सोनवणे यांसह भीमा पाटस बचाव समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राऊत म्हणाले..!
” भीमा पाटस सहकारी सहकार कारखाना भंगारात जातो आहे. शेतकऱ्याचे नुकसान होत आहे तुमचे लाडके चेअरमन राहुल कुल आणि प्रचंड घोटाळा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे. लहान लहान गोष्टीत पैसे खाल्ले आहेत.”
तुम्ही भ्रष्टाचारायला पाठीशी घालता. शेवटी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. असून एडीकडे देखील तक्रार दाखल करणार आहे. असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच याबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे.
आगामी २०२४ साली महाविकास आघाडीची सत्ता येणार असून त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार ? पाचशे कोटी रुपये पचू देणार नाही, महाराष्ट्रातील कारखाना कर्नाटकला चालविण्यासाठी देण्याचे कारणच काय ?? तुम्हाला चालवता येत नसेल तर बाजूला व्हा ? असे सवाल उपस्थित करत राऊतांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
खासदार संजय राऊत कारखाना स्थळी येत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु खासदार संजय राऊत हे कारखान्याच्या परिसरात जाऊन संस्थापक मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.