पुणे : उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी झगडा सुरू आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला घेरण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सापाला घाबरण्याची गरज नाही, असाही सल्ला दिल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ताब्यात घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. सोमवारी त्यांनी जुनी समिती बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामुळे संजय राऊत यांनी कोणाचेही नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले आहे की, ‘सापांच्या भीतीने जंगल सोडू नका’. या ट्विटच्या शेवटी, त्यांच्या ओळखीच्या शैलीत, ‘जय महाराष्ट्र!!’ देखील लिहिले. आमदार, खासदारांना पुन्हा उद्धव गटाकडे वळवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीच ५५ पैकी ४० आमदारांनी पक्ष सोडला आहे. याशिवाय नगरसेवकांनीही बंडखोरी केली आहे. आता खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.