छत्रपती संभाजीनगर : देशात आजपासून लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) च्या ७ पैकी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. एकीकडे मतदानाचा पहिला टप्पा संपलेला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यात जागावाटपाचा वाद मिटलेला दिसत नाहीयेय. या महायुतीमध्ये ठाणे, दक्षिण मुंबई, नाशिक, पालघर या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगराचाही (Chhatrapati Sambhajinagar) समावेश आहे. या जागेसाठी महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे, येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे. तसेच २५ एप्रिल (गुरुवारी) भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी महाविकास आघाडीने यासाठीच उमेदवाराची घोषणा केलीय. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार आहे, असे विचारले जात होते.
१८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. आता भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल (गुरुवार) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तसेच शिवसेना भाजप यांच्या युतीमध्ये हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. परंतु भाजपने देखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परंतु या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येथे शिवसैनिक V/S शिवसैनिक अशी लढत पक्की झालीय. परंतु आता येथे वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिलेला आहे, या उमेदवाराचा खैरे यांना फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे.