मुंबई : काँग्रेस नेते राहुल राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानाचे निषेध म्हणून त्यांच्या पदयात्रा रोखण्यासाठी मनसे सैनिक बुलढाण्याच्या दिशेने निघाले.
मात्र, त्यांना पोलिसांनी मध्येच अडवले आहे. पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या विधाना विरोधात मनसे देखील आक्रमक झाली आहे.
यामुळे त्यांनी आज (ता. १८ ) राहुल राहुल गांधी यांच्या विधानाचे निषेध म्हणून पदयात्रा रोखण्यासाठी मनसे सैनिक बुलढाण्याच्या दिशेने निघाले असता, त्या ठिकाणी मनसैनिकांची धरपकड केली.
त्यामुळे मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे या परिसरातील वातावरण तापले. पोलिसांनी मध्येच अडवले आणि मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले.