अजित जगताप
सातारा : देशाच्या स्वतंत्र लढ्यातील काँग्रेस पक्षाचे योगदान विसरलो तर तिरंगा यात्रा लोकांच्या पर्यंत पोहचणार नाही तसेच त्याग, बलिदान, आधुनिक राज्यघटनेचे प्रतिक आहे. त्या संविधानाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वडूज (ता. खटाव) येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत केले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशभरात स्थानिक पातळीवर पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर पदयात्रा काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सिद्धेश्वर कुरोली ते वडूज हुतात्मा स्मारक अशी पदयात्रा काढली होती. वडूज येथे हुतात्मा परशुराम घार्गे सह नऊ जण शहीद झाले. स्वतंत्र लढ्यातील माणसांची ओळख म्हणजे शहीद परशुराम घार्गे हे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कार्यकर्ते होते. १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती.
जनजागृती होऊन महात्मा गांधी यांनी काँग्रेस झेंडा हाती घेतला. लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. विदेशी कपड्याची होळी केली,काँग्रेसने एकात्मता भावना निर्माण केली. हिटलर हुकूमशाहीलाही विरोध केला. असे सांगून काँग्रेस नेते श्री चव्हाण यांनी सांगितले की, दि ९ ऑगस्ट १९४२ साली काँग्रेसची सभा झाली. चले जावो,, करो या मरो, नारा दिला.पाच वर्षे लढा दिला. या लढ्यात २४० माणसं शहीद झाली, आठ हजार माणसं जखमी झाले. अहिंसा मार्गाने आंदोलन केले.उत्तर प्रदेशातील युवकांनी कापरी कांड घडवून इंग्रजांचा खजिना ही लुटला होता.पत्री सरकारने तीन जिल्ह्यात प्रती सरकार स्थापन केले होते.त्याला पत्री सरकार असे ग्रामीण भागात बोलत असे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा अभ्यास करून घटना तयार केली.त्याची ताकद खूप मोठी आहे. पूर्वी देशाची लोकसंख्या३५कोटी होती. आज १३५ कोटी लोकसंख्या झाली आहे. काँग्रेसच्या राजवटीत सामाजिक स्वतंत्र महत्वाचे होते. आज दोन टक्के लोकांनी ९८ टक्के लोकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे संविधान रक्षणाची जबाबदारी सर्वाना घ्यावी लागणार आहे.
यावेळी युवा नेते रणजितसिंह देशमुख, काँग्रेस कमिटीचे डॉ संतोष गोडसे, विश्वासराव काळे, विजय ठिगळे, विजया शहा,मानाजी घाडगे,अभय देशमुख, महादेव बनसोडे, संजीव साळुंखे, ,विवेक,सुजाता महाजन, शारदा भस्मे, डॉ संतोष गोडसे,डॉ विवेक देशमुख,सुरेश लंगडे, राजुभाई मुलाणी,सत्यवान कांबळे, अंकुश जाधव, डॉ महेश गुरव, सतिश साठे, संतोष भंडारे,अजित कंठे, सुधाकर शिलवंत,परेश जाधव, श्रीराम कुलकर्णी,राहुल सजगणे, विवेक देशमुख,सरपंच शीतल देशमुख, आनंदराव साठे, सौ निलम कांबळे, डॉ महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले. इम्रान बागवान यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ, नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.