Maharashtra Politics : मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्विटने राज्यात सर्वांच्याच नजरा उंचावल्या आहेत. काल हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता निवडणूकांचे वारे वाहू लागले. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप-आरएसएसची बैठक पार पडली. त्यातील काही गोष्टींवर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय? यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. असे त्यांनी ट्विटमधे म्हटले आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये ते म्हणाले होते की, “ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.”
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपाचा मूळ मतदार हा भ्रष्टाचार विरोधी आहे. २०१४ साली या मतदारांनी भाजपाला पूर्ण ताकदीनिशी सत्ता आणून दिली. आता तो भाजपापासून दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक लढवायची असेल तर कमळाच्या चिन्हावर लढवावी, असा एक मतप्रवाह संघ आणि भाजपात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघ मुख्यालयात का गेले? याची मला कल्पना नाही. पण ते शिवसैनिक होण्याअगोदर स्वयंसेवक होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते संघ शाखेत जात होते, असेही आव्हाड म्हणाले.