मुंबई : या सर्व घटनेवर कोणता निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील. ते काय निर्णय घेतील यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी देखील अशी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचे अनेक दाखले आमच्याकडे आहेत, त्यामुळे या विषयावर वाद घालणे टाळावे. संजय राऊत यांनी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, हे विसरून चालणार नाही. यामुळेच सर्वानी राजशिष्टाचाराचे पालन करावे, अन्यथा राजकीय वातावरण बिघडू शकते, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. यावरून राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र असताना सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सत्तार यांची कानउघाडणी केली होती. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.