Rohit Pavar News : हडपसर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे हडपसर परिसरात असलेल्या सृजन या कार्यालयातील साहित्य अज्ञात दोघांनी जाळून टाकल्याची घटना घडली आहे. तसेच कार्यालयाला काळे फासण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. १५) मध्यरात्री रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Rohit Pavar News)
कार्यालयाला काळे फासण्याचाही प्रयत्न.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला का? अशी चर्चा सुरु आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. दरम्यान या घटनेबाबत रोहित पवार यांच्याकडून अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.(Rohit Pavar News)
रोहित पवार यांच्या पुण्यातील ऑफिसमधील साहित्य जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.(Rohit Pavar News)
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी लोणावळा येथील एक फोटो शुक्रवारी ट्विट केला. त्या टि्वटच्या माध्यमातून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षानेही राजकारणासाठी चुकीचा मार्ग निवडला असल्याचे त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी रोहित पवार यांना ट्रोलही केले होते.